ही एक अशी MQ (Mind Quotient) चाचणी आहे की; जी आपल्या आयुष्याची दिशा बदलण्यास आपल्याला मदत करेल... कारण आयुष्यातील यश आणि आनंद हे बुद्धीमत्तेपेक्षाही गुणवत्तेवर अवलंबून असते. इथे गुणवत्ता म्हणजे परीक्षेतील मार्क्स नाहेत, तर त्या व्यक्तीचे व्यक्तिमत्व होय! ही चाचणी आपल्या व्यक्तिमत्वाचे परिपूर्ण मापन करते. ती तुमच्या व्यक्तिमत्वातील शक्तिस्थाने, उणीवा, संधी व धोके (SWOT - Strength, Weakness, Opportunity and Theat) सांगेल.
ही चाचणी महाराष्टातील हजारो विद्यार्थी, शिक्षक, युवक-युवती, नोकरदार व व्यावसायिक अशा सर्व स्तरातील व वयोगटातील लोकांनी दिली असून; तिची उपयुक्तता व अचूकता त्यांनी मान्य केली आहे. त्यांना स्पष्ट, उपयोगी व परिपूर्ण असे मार्गदर्शन त्यातून त्यांना लाभले आहे.
ही कसोटी देणे हा एक मजेशीर अनुभव आहे. यात आपल्या नेहमीच्या जीवनावरील प्रश्न आहेत. या कसोटीमध्ये आपण प्रामाणिक उत्तरे देणे अपेक्षित आहे. ही उत्तरे आदर्श आहेत किंवा समाजात किती मान्य आहेत यापेक्षा, तुमच्या बाबतीत यांची उत्तर काय आहेत हे अधिक महत्वाचे आहे. यामुळे आपले अधिकाधिक अचूक मापन होऊ शकते व आपणास आपल्या व्यक्तिमत्वाची अचूक ओळख होऊ शकते. या कसोटीचा उद्देश आपणास आपल्या व्यक्तिमत्वाची ओळख करून देणे हा आहे. त्यामुळे हे मापन मोकळेपणे स्वीकारून आपण त्यात अधिकाधिक सुधारणा करण्यासाठी प्रयत्न करावेत ही अपेक्षा... या कसोटीतील प्रत्येक वाक्य हे संशोधनाच्या कसोटीवर लावून निवडले आहे. या कसोटीतील वाक्यांचे अनेकदा संख्यात्मक विश्लेषण (Statistical alnalysis) पद्धतीने पुनर्लेखन(Revison) केले आहे.
सर्व गुणवैशिष्ट्यांच्या बाबतीत, व्यक्ती आपल्या अभिव्यक्तीच्या आधारे, स्वतःची योग्यता अयोग्यता तपासून मनातल्या मनात स्वतःचे एक मानसिक चित्र तयार करते त्यास आत्मप्रतिमा म्हणतात. व्यक्तीने स्वतःबद्दल तयार केलेली ती स्वसंकल्पनाच होय. अर्थातच स्वतःची स्वतःला असणारी ओळख.
आपल्या कुवतीचा व सामर्थ्याचा अंदाज घेऊन, आपणांस योग्य अशा कोणत्याही आवडीच्या क्षेत्रात, अधिकाधिक उत्कृष्टतेकडे वाटचाल किंवा प्रगती करण्याची महत्वाची अशी तीव्र आकांक्षा म्हणजे महत्वाकांक्षा. आपल्या कुवतीचा व सामर्थ्याचा अंदाज घेऊन, आपणांस योग्य अशा कोणत्याही आवडीच्या क्षेत्रात, अधिकाधिक उत्कृष्टतेकडे वाटचाल किंवा प्रगती करण्याची महत्वाची अशी तीव्र आकांक्षा म्हणजे महत्वाकांक्षा.
एखादी गोष्ट आपल्या हातून पूर्ण होईल किंवा नाही हे ठामपणे व्यक्त करणे आणि त्याप्रमाणे ती प्रत्यक्ष पूर्ण करून दाखविणे म्हणजे आत्मविश्वास.
जीवनातील कोणत्याही प्रसंगी, परिणाम काय होतील किंवा कशा प्रकारची फलनिष्पत्ती होईल याचा अचूक अंदाज घेऊनच आचार, विचार व कृती या माध्यमातून आपल्या अभिव्यक्तीची दिशा निश्चित करण्याची प्रेरणाशक्ती म्हणजे निर्णयशक्ती.
मानवी जीवनातील प्रचलित विचार-संकल्पना, साधने व पद्धती यांच्या गुणधर्माचा व वैशिष्ट्यांचा नवीन प्रकारे मेळ किंवा संयोग करून, उपयुक्त पुनर्रचना करून आणि नाविन्यपूर्ण बदल घडवून आणण्याची क्षमता म्हणजे सर्जनशीलता.
व्यक्तिमत्वाचा कोणत्याही माध्यमातून केलेला आविष्कार म्हणजे अभिव्यक्ती. आपल्या सुप्त क्षमता, कौशल्ये व वृत्ती यांचे उपयोजन करण्याच्या दृष्टीने केलेली कृती म्हणजे अभिव्यक्ती.
इतर कुणाचेही नुकसान न करता, रचनात्मक वर्तनास व कृतीस प्रेरणात्मक ठरणारी अशी जी वृत्ती असते त्या वृत्तीस विधायक वृत्ती म्हणतात.
सर्व जगाला विसरून, आपल्या विचारांची, आचारांची व कृतींची दिशा निश्चित करून मनः शक्तींचे केद्रीकर करण्याची अवस्था म्हणजे एकाग्रता.
आपल्या सर्व शारीरिक प्रक्रिया कार्यक्षम राहण्याच्या दृष्टीने शरीरातील सर्व ज्ञानेंद्रिये व कर्मेंद्रिये यांची सुव्यवस्थित अवस्था म्हणजे शारीरिक स्वास्थ.
आपले सर्व मनोव्यापार सुरळीत राहून सर्व मानसिक यंत्रणा कार्यक्षम राहण्याच्या दृष्टीने सुव्यवस्थित अवस्था म्हणजे मानसिक आरोग्य.
आजूबाजूच्या किंवा एकूण परिस्थितीवर मत करून अभिव्यक्तींच्या आधारे यश संपादन करण्याची क्षमता म्हणजे समायोजन क्षमता.
कोणत्या ना कोणत्या स्वरुपात किंवा माध्यमाद्वारे व्यक्तीला प्रेमाचा आधार व आपुलकीची वागणूक मिळणे यास भावनिक सुरक्षितता म्हणतात.